चिखली (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची काल भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील फरार हल्लेखोर आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीतील साने चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी आज (शनिवारी) कडकडीत बंद पुकारत निषेध नोंदवला आहे.
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौक येथील कार्यालयाची काल (शुक्रवारी) काही अज्ञातांनी हत्यारांसह हल्ला करत तोडफोड करून मोठे नुकसान केले. भर चौकात, रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यातील आरोपी सीसी टिव्हीत कैद झाले असून पोलीस तपास सुरू आहेत. याप्रकरणी १२ तासांच्या आत हल्लेखोरांना अटक करा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा दत्ता साने यांनी दिला आहे. अद्यापही हल्लेखोरांचा तपास लागला नसून आज चिखलीतील साने चौक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group