बारामती (Pclive7.com):- आम्ही ८० वर्षांच्या योध्या सोबत असल्याचं बारामतीकरांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये सध्या फ्लेक्स झळकताना दिसत आहे. ज्यावर लिहिलं आहे की, आम्ही ८० वर्षांच्या योध्या सोबत… समस्त बारामतीकर खास बात अशी की, या फ्लेक्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. बारामतीकरांनी शरद पवारांना ८० वर्षांचा योद्धा म्हटलं आहे.
आज राज्याच्या राजकीय घडमोडी अशा घडल्या की सत्तास्थापनेचे सर्वच फासे पलटले. आज सकाळी राजभवनावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते अजित पवार यांनी सत्तास्थापन केली आणि राज्यातील सर्वांना मोठा धक्का दिला. राजभवनावर जाऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला. ही घटना म्हणजे राजकीय भूकंपच आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. यानंतर मात्र बारामतीकर हे पवारांच्या बाजून असून त्यांना समर्थन देत आहेत. बारामतीत सध्या फ्लेक्स झळकत आहेत. ज्यात बारामतीकर हे पवारांच्या सोबत आहेत असा मजकूर लिहिला आहे. प्रत्येकजण शरद पवारांच्या बाजूनं असल्याचं सांगत आहे. अनेकांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आम्ही शरद पवारांच्या बाजूनं असल्याचं म्हटलं आहे.