पिंपरी (Pclive7.com):- दिल्ली विधानसभा निवडणुका संपताच केंद्रातील भाजपा सरकारने आत्तापर्यंतची सर्वात जास्त गॅसदरवाढ केली आहे. त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२०) आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवरती स्वयंपाक करून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहर अध्यक्ष वैशाली काळभोर, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे आणि आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group