पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलायं. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (दि.२५) आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विलास मडेगिरी, उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, अमोल थोरात, एकनाथ पवार, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, माऊली थोरात, बाबू नायर, शैला मोळक तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group