पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बालाजी लॉन्स काळेवाडी येथे ब्रम्हाकुमारी राजयोगिनी डॉ. दादी रतनमोहिनीजी यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी समवेत नगरसदस्य संतोष कोकणे, संदिप वाघेरे, सागर आंगोळकर, नगरसदस्या निता पाडाळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्या गिरिजा कुदळे, जवाहर कोटवाणी, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते.