पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकाने तसेच गोडाऊनला रात्री सव्वा अकराच्या सुमारास भीषण आग लागली आहे. (चित्तराव गणपती मंदिर काळेवाडी पुल) जवळ ही घटना घडली असून आगीचे नेमकं कारण समजू शकले नाही.
या भागात अनेक अनधिकृत पत्राशेडमध्ये गोडाऊन उभारण्यात आले आहेत. आग पसरत असल्याने आजूबाजूला असलेल्या शेड ने पेट घेतला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






















Join Our Whatsapp Group