मुंबई (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद (१० वी आणि १२ वी वगळता) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिवेशना दरम्यान दिली आहे. कोरोनाबाबत घेण्यात आलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला असून आता रूग्णांची संख्या १० वर गेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे मधील स्विमींग पुल देखील बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाटयगृहे हे आज मध्यरात्रीपासून बंद राहणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group