पिंपरी (Pclive7.com):- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या फोटोला जोडे मारल्याच्या गुन्ह्यातून पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या १५ कार्यकर्त्यांची पिंपरी न्यायालयाने शुक्रवारी (दि. १३) निर्दोष मुक्तता केली.
चार वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्याच्या निषेधासाठी पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच नवाब मलिक यांच्या फोटोला जोडे मारले होते. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्ते मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अमोल थोरात, विशाल वाळुंजकर, दिपक नागरगोजे, आदिनाथ माळवे, संजय बडे, सचिन मुंढे, धर्मेंद्र क्षीरसागर, संकेत वाघमारे, धनंजय शाळीग्राम, सोमनाथ भोंडवे, सचिन शिवले, प्रवीण सिंग आणि वीणा सोनवलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पिंपरी येथील न्यायालयात शुक्रवारी (दि. १३) अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने या सर्वांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी जेष्ठनेते सदाशिव खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group