तळेगाव (Pclive7.com):- ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती आणि शिवजयंती उत्सव समिती तळेगाव दाभाडे यांच्या सहभागातून हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव तळेगावात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

यात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे, श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे यांनी शिवप्रतिमेचे पुजन करुन भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. इंद्रायणी स्पोर्टस् क्लबच्या बाल चिमुकल्याणी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिक हे या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण ठरले.ढोल, ताशे, बँण्ड, पारंपारिक वाद्यांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा होऊन शाळा चौक येथे मिरवणूकीची सांगता झाली. विशेष म्हणजे खडक मोहल्ला परिसरात मुस्लिम समाजातील नागरिकांनी मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या वेळेस महिलांनी शिवप्रतिमेला पुप्षहार अर्पण केला. या मिरवणूकीत तळेगावातील जेष्ठ नागरीक, महिला, बाल मावळे यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहण्यास मिळाला.






















Join Our Whatsapp Group