पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील चिखली जाधववाडीतील इंद्रायणी नदीकाठी, भैरोबा मंदिरामागे रंजन वजन काट्याजवळ आज सोमवारी दि. २० रोजी लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकडाच्या गोदामाला दुपारी अडीच ते तीन वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. त्यानुसार अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली.
घटनास्थळी धाव घेत अग्निशामक विभागाच्या चार बंबाद्वारे आग विझवण्याचा अथक प्रयत्न सुरू आहे. मात्र आग आटोक्यात आली नसून सद्य स्थितीला आग धुमसत आहे. आगीत जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी नाही, अशी माहिती मिळत आहे.






















Join Our Whatsapp Group