पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिंपरीगाव आणि काळेवाडी फाटा या परिसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे या दोन्ही ठिकाणचे काही भाग सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. आज (दि.२८) रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून खाली नमूद करण्यात आलेला परिसर सील करण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग बंद ठेवण्यात येणार असून येथून बाहेर जाण्यास अथवा या परिसरात येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
सील करण्यात येणारा भाग खालील प्रमाणे..
१) स.नं. २२४/१, तपोवन मंदिर रोड, पिंपरीगाव
(सुखवानी सिटी – वोडाफोन स्टोअर्स – नंद किराणा स्टोअर्स – ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स – कापसे चौक – माऊली चहा – वाडेकर मिसळ – सुखवानी सिटी)
२) १६ नंबर बस स्टॉप, काळेवाडी फाटा, वाकड
(प्रोक्स सॉफ्टवेअर प्रा. लि. – औंध रावेत बीआरटी रोड – प्रेम कुल्फी – इंडियन बँक – अक्षय पार्क – प्रोक्स सॉफ्टवेअर प्रा लि)






















Join Our Whatsapp Group