पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे असं विधान करणार्या भाजप नेते निलेश राणे यांच्या फोटोला शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने फुटलेल्या बांगड्याचा हार घालण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे त्यांच्या मंत्रीमंडळाच्या सोबत कोरोना विषाणु व इतर महत्वाच्या गोष्टींवर चांगले निर्णय घेत आहेत. परंतु स्वत:च्या प्रसिध्दीसाठी माजी खासदार भाजपाचे स्वयंम घोषित नेते निलेश नारायण राणे हे बेअकलीपणे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करित असल्याचे सांगत शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. दाखले यांनी निलेश राणे यांच्या फोटोला फुटलेल्या बांगड्यांचा हार घालून त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.






















Join Our Whatsapp Group