नवी दिल्ली (Pclive7.com):- लॉकडाऊन दुसरा कालावधी संपण्यास आता केवळ २ दिवस शिल्लक राहिले असतानाही कोरोनाला नियंत्रणात आणण्यात अजून तरी देशाला यश आलेले दिसत नाही. देशात गेल्या २४ तासात १ हजार ९९३ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या ३५ हजार ४३ पर्यंत पोहचली आहे. यापैकी २५ हजार ७ रुग्ण सक्रीय असून देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
देशभरात गेल्या २४ तासात ७३ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला. त्यामुळे आतापर्यंत देशात १ हजार १४७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला आहे. देशभरात गुरुवारी दिवसभरात ५६४ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ८ हजार ८८९ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group