पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्यावतीने चिखली, जाधववाडी परिसरातील ५ हजार नागरिकांना दररोज अन्नदान करण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थीतीत राहुल जाधव यांच्या या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
कोरोना या महामारीच्या संकटाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन ची मदत १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. चिखली, जाधववाडी या परिसरात बाहेरिल कामगार वर्ग जास्त प्रमाणात आहेत. तरी प्रभागातील जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न उत्पन्न होऊ नये म्हणून भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या सहकार्याने माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे. आतापर्यंत प्रभागातील जनतेसाठी किराणा साहित्य, भाजीपाला, जंतुनाशक औषध फवारणी अशा प्रकारच्या विविध सेवा प्रभाग क्र.२ मध्ये करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील गरजूंना मदत करण्यात येत आहे. मागील आठवड्यामध्ये प्रभागातील जनतेची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मागील दोन दिवसांपासून दररोज ५ हजार नागरिकांनी मोफत अन्नदान करण्यात येत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामधील एकही नागरिक उपाशी राहणार नाही. यासाठी योग्य ते नियाजन करण्यात येईल. तसेच जोपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत जनसेवा ही अशीच चालू राहील. तसेच लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन राहुल जाधव यांनी केले.



















Join Our Whatsapp Group