पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकाटा विरोधातील लढ्यात आता नागरिकांचा सहभाग देखील वाढत आहे. भोसरीमधील आळंदीरोडवर असलेल्या ‘संभाजीनगर’ या वसाहतीतील रहिवासी पुढे आले आहेत. सामाजिक बांधिलकी राखत येथील रहिवाशांनी ४३ हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीमधील आळंदीरोडवर ‘संभाजीनगर’ ही वसाहत आहे. सुमारे १६०० लोकसंख्या असलेला या परिसरातील नागरिकांनी कोरोनाच्या या लढाईत आपला सहभाग नोंदविला आहे. येथील रहिवाशांनी सामाजिक बांधिलकी जपत ४३ हजार रूपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून योग्या त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे राज्यातील उद्योगधंदे तसेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला कोरोनाच्या लढाईत आर्थिक मदतीची गरज असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच संभाजीनगर येथील रहिवाशांनी या परिस्थितीचे भान राखत ४३ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. येथील रहिवाशांनी यापूर्वी देखील कोरोनाच्या या लढाईत योध्दा प्रमाणे कार्य करणाऱ्या सफाई कर्मचारी तसेच पोलिस बांधवांना सॅनिटायझरचे वाटप करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राज्यावर संकट आल्यावर संभाजीनगरच्या रहिवाशांनी दाखवलेले सामाजिक भान तसेच उदारता खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत शहरातील इतर सोसायट्या, वसाहती यांनी देखील अशाच पद्धतीने आपला सहभाग नोंदवत मदतीचा हात पुढे केला पाहिजे.






















Join Our Whatsapp Group