पिंपरी (Pclive7.com):- म्हाडा मोरवाडी पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने यांची कन्या कु.भूमी दिपक भोजने हिचा वाढदिवस अनोख्या पध्दतीनं साजरा करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी, चाफेकर चौक येथील पोलीस व वार्डन यांना नाष्टा, पाण्याच्या बाॅटल देण्यात आल्या. तसेच मोरवाडी म्हाडा मधील सोसायटीतील लहान मुलांना व सुरक्षा रक्षकांना ‘माक्स’ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
भूमी हिने साठवलेल्या ३ हजार ५०० रूपये यातून ‘माक्स, नाष्ट, पाण्याच्या बाॅटलसाठी खर्च केला. वडील दिपक भोजने व चुलते बीआरटीएसचे उपअभियंता विजय भोजने हे समाज कार्य करत असतात त्याच्या प्रेरणेतुन तिला हे कार्य करण्याचा ईच्छा झाली आणि तिने ही इच्छा पुर्ण देखील केली. यावेळी रजनीकांत गायकवाड, निरज भोजने व सोसायटीतील लहान मुले उपस्थितीत होते.






















Join Our Whatsapp Group