पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांचे वडील ह.भ.प.पै.विठोबा सोनबा लांडे (वय १०२) यांचे आज दि.३० जून रोजी सकाळी वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी १० वाजता भोसरी येथे होणार आहे.
कै. विठोबा लांडे हे १९७९ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या मागे मुलगा माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे. कोरोना आजाराच्या साथीमुळे कोणीही अंत्यविधीसाठी उपस्थित राहू नये ही विनंती माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group