पिंपरी (Pclive7.com):- गांधीनगर, खरळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत असून ३ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व क प्रभाग अधिकारी यांनी गांधीनगर, खरळवाडी परिसरात योग्य लक्ष द्यावे आणि येथील नागरिकांना आरोग्य उपचाराचे साधन पूर्वावेत तसेच या भागातील जास्तीत जास्त व्यक्तींची चाचणी करावी संपूर्ण परिसरामध्ये औषध फवारणी करावी अशी मागणी वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजिज शेख यांनी केली आहे.
याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि सीमाताई आठवले यांना परिस्थितीची माहिती दिली असून त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे अजिज शेख यांनी सांगितले, गांधीनगर परिसरात बहुसंख्य दलित मागासवर्गीय समाज राहत असून महानगरपालिकेने दलित नागरिकांचा निधी या ठिकाणी खर्च करून नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे अजिज शेख म्हणाले.




















Join Our Whatsapp Group