पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा कहर सुरुच आहे. यात आता उद्रेक झाला असून शहराच्या विविध भागातील तब्बल ५७३ आणि शहराबाहेरील ८ जणांना आज (दि.०६) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या ४८६१ वर पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून २०० ते ३०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आज तर शहरातील तब्बल ५७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका हद्दीबाहेरील ८ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३६३ जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज खेड येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत ४८६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २९०६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील ६७ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या ३२ अशा ९९ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १८६३ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
✳️ आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह = ४८६१
✳️ आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ५७३
✳️ आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ०८
✳️ सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = १८६३
✳️ एकूण मृत = ९९ (आज =०१)(Pcmc ६७ + ३२ बाहेरील)
✳️ एकूण कोरोनामुक्त = २९०६ (आज ३६३ रूग्ण डिस्चार्ज)
✳️ आज दाखल संशयित रूग्ण = ६१४
✳️ आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = ५०५
✳️ प्रतिक्षेतील अहवाल = १३९२
✳️ आज होम क्वारंटाईन = २०९ (एकूण = २९३७५) ✳️ दैनंदिन सर्व्हेक्षण = ७९८३९























Join Our Whatsapp Group