पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शामराव गायकवाड (वय-६५ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने रविवार दि.१९ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.पिंपरी चिंचवड शहरातील दलित चळवळीच्या विविध घटनांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनाने दलित चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता हरपल्याची भावना रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group