पिंपरी (Pclive7.com):- एक अज्ञात इसम वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून मी टीव्ही 9 चा रिपोर्टर बोलतोय अशी खोटी बतावणी करून भाजपा मधील अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फोन करून उमा खापरे व अमित गोरखे यांना भाजपाने एवढी मोठी जबाबदारी का दिली. याविषयी आपण सर्वांनी आवाज का उठवू नये, अशी चिथावणीखोर वक्तव्य करून भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चार नंबर वरून अनेकांना फोन करून टीव्ही 9 रिपोर्टर असे सांगून चिथावणी खोर वक्तव्य करून पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
याबाबतची तक्रार आज उमा खापरे व अमित गोरखे यांनी यमुनानगर पोलीस चौकीमध्ये दाखल केली असून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. निवेदन देताना भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, सरचिटणीस व नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शैला मोळक उपस्थित होते. या प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी याप्रसंगी दिले आहे.























Join Our Whatsapp Group