पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे आज (दि.२६) कोरोनामुळे निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापासून सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज आज संपली आहे.
प्रभाग क्रमांक ४ दिघी-बोपखेलमधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून लक्ष्मण उंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.






















Join Our Whatsapp Group