पिंपरी (Pclive7.com):- इतर राज्यात धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे; परंतु महाराष्ट्रात मात्र एस.टी. आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवण्यात आले आहे. आमच्या हक्काचे आरक्षण आम्हांला मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड तहसीलदार यांना शहर धनगर समाज महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.
शुक्रवारी (दि.२५) आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयात महासंघाचे अध्यक्ष भाजप सरचिटणीस माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली वीणा सोनवलकर, सोनाताई गडदे, नंदाताई करे, शरद कर्णवार, रणजित हापटे, साहिल धीवर, निखिल पडळकर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.
महाराष्ट्रात दीडकोटी धनगर समाज आहे. भटकंती करून उपजीविका करणारा हा समाज आहे. इतर राज्यात धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही ते द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group