पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. येत्या सोमवारी (दि.१९) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.
कोरोनामुळे विषय समितीच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. पालिकेतील समित्यांची मुदत संपल्याने बरखास्त झाल्या होत्या. अनलॉकमध्ये राज्य सरकारने ऑनलाईन सभेद्वारे निवडणुका घेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. नव्याने विषय समित्यांचे गठन केले जाणार आहे.
त्यानुसार महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली, अशी माहिती पक्षनेते ढाके यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group