वडगाव मावळ (Pclive7.com):- महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहे. त्यामुळे नक्कीच निवडुन येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वडगाव येथील पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
यावेळी आमदार सुनिल शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माऊली दाभाडे, युवानेते पार्थ पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष बबन भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापु भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, सुभाष जाधव, गणेश काकडे, गणेश खांडगे, मयुर ढोरे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, किशोर भेगडे, जीवन गायकवाड, शिवसेना नेत्या शादान भाभी चौधरी, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगिता शेळके व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन संपर्क साधावा. आपला उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारा व स्वच्छ प्रतिमा असलेला आहे. त्यामुळे आपण एक चांगले नेतृत्व देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.
“महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडावी व महाविकास आघाडीच्या उमेदवारास मावळातुन सर्वाधिक मते मिळवुन द्यावी, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.






















Join Our Whatsapp Group