पिंपरी (Pclive7.com):- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने कोंढवा येथील विद्या विकास प्राथमिक स्कुलला ७० बेंचेस देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष डॉ.प्रवीण घाणेगावकर, सेवा संचालक मुकुंद मुळे, केशव माणगे, अजित कोठारी आदी उपस्थित होते.
या कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ़ पुणे लोकमान्य नगर, रोटरी क्लब ऑफ़ पुणे नॉर्थ यांचे विशेष सहकार्य मिळाले. विद्या विकास शाळेत आर्थिक दृष्ट्या अति दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असून पुण्यातील रोटरी क्लब शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवित आहेत.
रोटरी क्लब निगडीने सुमारे अडीच लाख रुपये खर्चून बेंचेस देण्यात आले. मुख्याध्यापिका सुरेखा कदम, संस्थापक श्री. मोहीते सर व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group