पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा यंदा सांगवीत होणार आहे.
सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पवनाथडी जत्रा भरविण्यासासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. गेल्या तेरा वर्षापासून जत्रेचे आयोजन केले जाते.
पुणे शहरातील भीमथडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने पवनाथडी जत्रा भरविण्यास गेल्या १३ वर्षांपूर्वी सुरूवात केली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी पवनाथडी यात्रा घेतली जाते. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी या जत्रेचे आयोजन केले जाते.
जत्रेच्या आयोजनासाठी केलेल्या तरतुदीमधून व प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चास मान्यता घेण्यासाठी महिला बालकल्याण समितीने स्थायी समितीकडे शिफारस केली होती. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.






















Join Our Whatsapp Group