पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग व आयुक्तांकडे निगडीतील दुर्गादेवी टेकडी येथे ‘मॉर्निंग वॉक’साठी जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दुर्गादेवी टेकडी परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय डॉक्टरांची टीम सज्ज केली आहे.
निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी दररोज २ ते ३ हजार नागरिक जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य यंत्रणेची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती.
गेल्या काही दिवसापूर्वी दैनिक जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचा तिथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांना त्यावेळी आरोग्य मदत मिळाली असती तर, कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. म्हणूनच अमित गोरखे यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करत तिथे रूग्णवाहिका आणि आरोग्यसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने सकाळी ६ ते ९ या वेळेत दुर्गादेवी टेकडी या ठिकाणी रूग्णवाहिका तसेच वैद्यकीय डॉक्टरांची टीम सज्ज केली आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी अमित गोरखे यांना लेखी पत्राव्दारे कळवले आहे.






















Join Our Whatsapp Group