पिंपरी (Pclive7.com):- केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम दि.१६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे. नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर, ६० वर्षावरील व्यक्ती तसेच ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधी (अतिजोखमीचे आजार) असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३८ व १७ खाजगी लसीकरण केंद्रावर दि.१६ जानेवारी २०२१ ते आज पर्यंत १,०२,३२१ नागरीकांना लसीकरण करण्यात करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की, पिंपरी चिंचवड शहरामधील ६० वर्षावरील व्यक्ती तसेच ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधी (अतिजोखमीचे आजार) असलेल्या नागरिकांनी दुर्धर आजार आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड- १९ प्रसार रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.
डॉ. पवन साळवे, अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका






















Join Our Whatsapp Group