पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनचे औचित्य साधून कोविड महामारीच्या कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची परवा न करता जनतेला वाचविण्यासाठी योगदान दिल्याबद्दल परिचारिकांचा सन्मान करून त्यांना भेट वस्तू देण्यात आली.
12 मे फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. कोविडच्या या महामारीत शहरातील रुग्णालयांच्या परिचारिका मनोभावे रुग्णांची सेवा करीत आहेत. परिचारिकांची सेवा हा वैद्यकीय क्षेत्राचा मुख्य कणा आहे. अशावेळी त्यांचा पुर्ण विश्वास परिचारिकांच्या सेवेवर असतो.
परिचारिका या वेळप्रसंगी आपल्या स्वता:च्या व कुटूंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन जीवावर उदार होऊन रुग्णाची सेवा सुश्रूषा करतात. परिचारिकांच्या या सेवाभावी वृत्तीला कै. भिकु वाघेरे-पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.