पिंपरी (Pclive7.com):- “मी भाजपामध्ये आनंदी आहे. एव्हढेच नाही, तर मी भाजपामध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे. त्यानंतर समाजसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे.” असे स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे.
‘फ्रेंडशिप डे’ निमित्त राष्ट्रवादीतील जुन्या मित्रांसोबत झालेली भेट आणि व्हायरल झालेला डान्सचा व्हिडीओ यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महेशदादांच्या ‘घरवापसी’बाबत केलेले वक्तव्य यावरून राष्ट्रवादीसह भाजपाच्या गोठात कमालीची अस्वस्थता पसरली होती. खरचं महेश लांडगे राष्ट्रवादीत जाणार का? याची उलटसुलट चर्चा सुरू होती.
दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी एक ‘पोस्ट’ शेअर करत सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, “आम्ही २०१६ मध्येच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये काम करण्याचा अनुभव अतुलनीय आहे. मी भाजपामध्ये आनंदी आहे. एव्हढेच नाही, तर मी भाजपामध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे. त्यानंतर समाजसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे.”






















Join Our Whatsapp Group