पिंपरी (Pclive7.com):- कोरोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण आहे. म्हणूनच ही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे.
प्रत्येकजण घरीच बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती घडवतोय. सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेसुध्दा भाऊ अतुलसोबत शाडूची बाप्पाची एक सुरेख मू्ती घडवली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा असणारी सोनाली कुलकर्णी हिच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. लग्नानंतर सोनालीचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. बेनोडेकरांची सून बनून सोनालीने तिच्या माहेरची गेल्या ५० वर्षांची परंपरा सुरू ठेवली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत सोनालीने चाहत्यांना तिच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घडवलं आहे. व्हिडिओत सोनाली गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देताना आणि गणपतीची पूजा करताना दिसत आहे.
सोनाली कुलकर्णीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “वर्षतली ही सर्वात सुंदर वेळ आहे. ३ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न यंदा ही असाच पुढे नेत आहोत…माझा भाऊ अतुल कुलकर्णी शाडू मातीची मुर्ती बनवतो आणि मी हळ्दी-कुंकुवाच्या पाण्यानी रंगवते…तयारी बाप्पा च्या आगमनाची” असं म्हणत सोनालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
बाप्पाचा आशीर्वाद सर्व भक्तांवर असाच सदैव राहू दे’व पुढील वर्षी कोरोना संपून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊ दे अशी प्रार्थना विघ्नहर्त्याकडे सोनालीने केली.






















Join Our Whatsapp Group