पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आणि कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, विलास मडेगिरी, राम वाकडकर, संतोष कलाटे आदी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी गजानन चिंचवडे यांच्या प्रवेशाची माहिती दिली. तसेच ‘आगे आगे देखो होता है क्या…’ असेही म्हटले आहे. त्यामुळे पुढे कोणत्या नेत्याचे पक्षांतर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.