पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी मुख्य बाजारपेठेतील बी-ब्लॉक १० आणि ११ मधील वीजपुरवठा मंगळवारी (दि.५) दुपारी चारपासून खंडित आहे. बुधवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. वीज नसल्याने या भागातील रहिवासी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मंगळवारी काही तांत्रिक करणांमुळे पिंपरी मुख्य बाझारपेठ बी-ब्लॉक १० आणि ११ मधील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी दोन तासांत वीज पुरवठा सुरळीत करतो असे सांगितले. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत देखील वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवासी आणि व्यावसायिकांची त्रस्त झाले होते.
स्थानिक रहिवासी मुकेश सेरवानी म्हणाले, महावितरण अधिकारी दोन तासांत वीजपुरवठा सुरू करतो म्हणून सांगितले पण अद्याप वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. घरात लहान मुले आहेत, मोबाईल चार्चिंग नाही, वर्क फ्रॉम होमची अडचण झाली आहे.
या भागात विद्युतवाहिनीत अनेक अडथळे आहेत, दुरुस्ती करत असताना विजेचा झटका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. महावितरण कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, दोन तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल.
डी. डी. बाबर – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पिंपरी महावितरण कार्यालय






















Join Our Whatsapp Group