पिंपरी (Pclive7.com):- जीतो पिंपरी चिंचवड चॅप्टर आणि जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ‘भगवान महावीर जैन भोजनालय’ चा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 17 नोव्हेंबर) सकाळी 10 वा. चिंचवड गाव येथे करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने जीतो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष संतोष धोका यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
युवाचार्य भगवंत प. पुज्य श्री महेंद्रऋषीजी महाराज साहेब आणि प. पुज्य उप प्रवर्तिनी सन्मतिजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत चिंचवड गावातील भगवान महावीर जैन भोजनालय, जीवराजजी भवन, दिलीप सोनीगरा ज्वेलर्सच्या समोर हा कार्यक्रम होणार आहे.
या भोजनालयात शुध्द शाकाहारी जैन सात्विक भोजन अल्पदरात देण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 4:30 ते सायंकाळी 6 पर्यंत (सुर्यास्तापर्यंत) भोजनालय सुरु राहिल अशीही माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.