भोसरी (Pclive7.com):- योगिताताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी आपण सुकन्या योजनेचा लाभ तीला मिळवून दिलात. आपण आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छांसाठी कार्यक्रम घेतलात पण शुभचिंतन व्यक्त केले सुकन्यांचे. अशी प्रतिक्रीया एका माऊलीने. नगरसेविका योगिता नागरगोजे यांचेपाशी बोलताना व्यक्त केली. तेव्हां उपस्थित जनसमुदायाने देखिल उपक्रमाबद्दल धन्यताच व्यक्त केली.
भोसरीचे कार्यक्षम आमदार व पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका योगिता नागरगोजे यांची दहा वर्षाखालील मुलींना सुकन्या वीमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आधार कार्ड काढणे आणि अपडेट करणे अशा मेळाव्याचे देखिल आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेशदादा लांडगे व देऊळ बंद चित्रपटामधील सर्वांची लाडकी बाल अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर नागरगोजे, दीपक नागरगोजे, तसेच सर्व प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group