पुणे (Pclive7.com):- पुणे शहर पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी आणि महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना आणण्यासाठी आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास कर्मचारी गेला होता. पण बराचवेळ झाला, तरी त्या फोन काही घेत नव्हत्या. अखेर त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, शिल्पा चव्हाण या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर या आत्महत्या मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्महत्या करण्या मागे कौटुंबिक कारण पुढे येत आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.