राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी पुरस्कार प्रदान होणार
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील शब्द पब्लिसिटी संस्थेच्या वतीने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासह २० मान्यवरांना (उद्या बुधवार दि.१६) राज्यस्तरिय ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार’ देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान केले जाणार आहेत.

बुधवारी दि.१६ रोजी संध्या.७ वा, मुंबई-पुणे महामार्गालगत, एएसएमचे सीएसआयटी कॅंम्पसमध्ये (पिंपळे पेट्रोल पंपामागे) हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी नगरसेविका शैलजा मोरे, दीपक कुदळे, उद्योजक संतोष बारणे, विकास साने, लक्ष्मण कांबळे, अनिल कुलकर्णी, जयदेव अक्कलकोटे, गणेश सस्ते, डॉ.अभिषेक करमाळकर, डॉ.विकेश मुथा, डॉ.प्रशांत टोणपे, डॉ.प्रसाद भाटे, डॉ.विजय सातव, डॉ. पद्मजा गरूड, डॉ. शंकर गरुड, डॉ. विनायक मोरे,

जगन्नाथ काटे, दिलीप सोनिगरा, सचिन सानप, डॉ.प्रकाश दिवाकरन, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. यशवंत इंगळे, अनुराधा गोरखे यांना पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी घोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.






















Join Our Whatsapp Group