पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली पिंपळे सौदागर मास्टर शेफ-२०२२ ‘शोध सुगरणीचा’ हि पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये परिक्षकांना आपल्या पाककलेची भुरळ घालत सौ.श्रद्धा वर्मा स्पर्धेच्या मानकरी ठरल्या आहेत. या स्पर्धेेचे आयोजन नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी केले होते.
या स्पर्धेमध्ये सुमारे ३०० महिलांनी आपला सहभाग नोंदवला. त्या मधून स्नेहलता करपे, जान्हवी किटे, मनीषा गवळी, श्रद्धा वर्मा, ऊषा भारद्वाज, प्राजक्ता जोशी, मनीषा पिल्ले, स्मिता पवार, श्रद्धा खराटे, प्राजक्ता तळेकर अश्या १० स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये द्वितीय क्रमांक स्मिता पवार, तृतीय क्रमांक जान्हवी किटे यांनी पटकावला. यावेळी परिक्षनाचे काम शेफ.अमरजी राणे, परागजी कान्हेरे, प्रसादजी कुलकर्णी यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त यावेळी शिवभक्त पल्लवी पाचबोले या युवतीने तलवार बाजी, लाठी, दांडपट्टा अश्या मर्दानी खेळाने उपास्थितांचे मन जिंकले. यावेळी सेलेब्रेटी आर.जे.अक्षय यांनी आपली निवेदनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, सभापती सविताताई खुळे, नगरसेविका आरतीताई चोंधे, नगरसेविका सुनिताताई तापकिर, स्वातीताई हुलावळे, सुप्रियाताई पाटिल, क्रांतिताई सोमवंशी, कल्याणीताई शेलार, २०२१ मास्टर शेफ विनर काजल मंत्री व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी प्रभागामध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच यापुढील काळामध्ये महिलांमधील कलागुणांना कसा वाव देता येईल. अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमधून महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम बनवण्यासाठी उपाययोजना करण्याचे अश्वासन दिले.