पिंपरी (Pclive7.com):- प्रकाश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने वाकडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद नगर, काळाखडक, वाकड या ठिकाणी प्रकाश गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.

सकाळपासूनच उत्साहाच्या वातावरणात युवक, तरुण, तरुणी आणि महिलांची रक्तदानासाठी रिघ लागली होती. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मना-मनात व घरा-घरात पोहोचावेत म्हणुन प्रकाश गायकवाड मित्र परिवार यांच्यावतीने रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तिपत्रासोबतच ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील आणि पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून समाजउपयोगी कार्यक्रम राबविल्या बद्दल आयोजकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन कोरोनाचे सर्व नियम पाळुन करण्यात आले होते.
Tags: latest marathi newsPCLIVE7.COMPCMCPcmc newsपिंपरी चिंचवडप्रकाश गायकवाड मित्र परिवाररक्तदान शिबीरशिवजयंती






















Join Our Whatsapp Group