पिंपरी (Pclive7.com):- शनिवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. केशवनगर चिंचवड येथे मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने जेष्ठ नागरिक ह.भ.प. पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, आरती करून, शिवस्तोत्र म्हणून विधिवत पूजा करण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटून महाराजांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी अनेकांनी महाराजांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.
यावेळी राजू कोरे, गणेश बच्चे, गोपाळ शिंदे, गौरव पवार, पोपट बच्चे, श्रीकृष्ण माळी, राजू ततापुरे, विजय कदम, सौ.रोहिणी बच्चे, गीता कोरे, अर्चना बच्चे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, अमित धारणे, सीताराम माळी, राजेश दहिवाड, आदी मान्यवर व शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते.