पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच राज ठाकरे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा येणार असल्याचे त्यांनी स्वतः यावेळी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. महिला सेनेच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी सेनेच्या वतीने गदा भेट देण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड मनसे शहरप्रमुख सचिन चिखले, विद्यार्थी सेना अधक्ष हेमंत डांगे, माजी आमदार नितीन सरदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर, महाराष्ट्र राज्याचे नेते अनिल शिदोरे, किशोरजी शिंदे, गणेश आप्पा सातपुते, रनजीत शिरोळे, हेमंत संभोस, प्रशांत कनोजिया, पिंपरी-चिंचवड शहरातील उपशहर अध्यक्ष विशाल जी मानकरी, राजू सावळे, बाळा दानवले, विभागातील अंकुश तापकीर दत्ता देवतरासे, मयूर दादा चिंचवडे, जनहित कक्षाच्या अध्यक्ष राजू भालेराव, परदेसी, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, सुजाता काटे, अनिकेत प्रभु , प्रतिक शिंदे , व सर्व शहरातील सर्व मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.