पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडीगांवचे सुपुत्र व पीएमपीएमएलचे कंट्रोलर कम-चेकर काळुराम पांडुरंग लांडगे यांना महाराष्ट्र कामगार मंडळाचा सन २०१९ चा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे.
काळुराम लांडगे हे ३२ वर्ष नोकरी करत आहेत. पहिले पूर्व पीसीएमटी व आताची पीएमटी दोन्ही संस्था एकत्र मिळवुन सन २००७ साली पीएमपीएमएल संस्था स्थापन झाली आहे. काळुराम लांडगे यांना विविध संस्था व महामंडळे मिळून २० पुरस्काराने आत्तापर्यत सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारामुळे पीएमपीएमएलचे नाव अगदी सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचले आहे. पीएमपीएमएल संस्था झाल्यापासून महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळवणारे काळुराम लांडगे हे पहिले कर्मचारी ठरले आहेत.
काळुराम लांडगे यांनी महाराष्ट्र गुणवंत कामगार मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक लक्ष्मीनारायणजी मिश्रा, सहव्यवस्थापकिय संचालक डॉ.चेतना केरूरे, मुख्यालय क्रमांक २ पिंपरीचे प्रमुख संतोषजी माने, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रयजी झेंडे, नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्रशासन अधिकारी नितिनजी घोगरे, पीएमपीएमएलचे बीआरटी मॅनेजर सतिशजी गव्हाणे, मुख्यालय क्रमांक २ पिंपरीचे प्रमुख सुनिल दिवाणजी, निगडी डेपोचे आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, भोसरी डेपोचे आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण, कोथरूड डेपोचे आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
ह्या पुरस्कारामुळे संपूर्ण पीएमपीएमएलचे कामगार, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.