पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डाॅ.सौ.वेदा विजय नलावडे यांना भारतज्योती प्रतिभारत्न नारीगौरव पुरस्कार-2022 ने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील श्री.उद्यान सभागृहात आयोजित कार्यक्रमात होमिओपॅथी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेतर्फे डाॅ.वेदा नलावडे यांना गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह व महावस्र असे होते. जेष्ठ साहित्यिक श्री.रमेश आव्हाड, विचारवंत शामसुंदर महाराज आळंदीकर, डाॅ.जे सानिपिना राव आदि मान्यवर या गौरव सोहळ्याला उपस्थित होते.
डाॅ.वेदा नलावडे या पिंपळे सौदागर येथील इंजिनिअस होमिओपॅथी क्लिनिकच्या संचालिका असून काॅस्मेटोलाॅजी व ट्रायकाॅलाॅजी निष्णात आहेत. शेकडो रुग्णांना त्यांनी होमिओपॅथीच्या विशेष उपचारपद्धतीने व्याधीमुक्त केले आहे.






















Join Our Whatsapp Group