पिंपरी (Pclive7.com):- समाजसेवक डॉ. रमेश बंसल यांच्यासह निगडी प्राधिकरणातील नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे निगडी प्राधिकरणातील सेक्टर 27- ए” ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “श्री महाराजा अग्रसेननगर” असे नामकरण करण्यात आले. महानगरपालिकाने उभारलेल्या “श्री महाराजा अग्रसेननगर” नामफलकाचे आज उदघाटन करण्यात आले.

यावेळी समाजसेवक डॉ. रमेश बन्सल, राजेंद्र बाबर, श्री अग्रसेन महाराज ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, माजी अध्यक्ष राजकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष विनोद शिवनारायण बन्सल, बांधकाम व्यावसायिक सुनील रामेश्वर अग्रवाल, संदीप गुप्ता, सरसंघचालक विनोद सुरजभान बन्सल, गुरुकुल चिंचवड ग्राम उपाध्यक्षा शकुंतला विनोद बन्सल, राकेश सिंघानिया, राणू सिंघानिया, मोहन गर्ग आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.रमेश बन्सल म्हणाले की, महाराजाधिराज श्री अग्रसेनजी महाराज यांच्या नावाने हे निगडी प्राधिकरणातील एका सेक्टरला नाव देणे अग्रवाल समाजासाठी मोठी बाब आहे. आपल्या तमाम वंशजांना अभिमान वाटेल असे कार्य आहे. महाराजाधिराज श्री अग्रसेनजी महाराजांच्या कीर्तीचा हा गौरव आहे. प्राधिकरणाच्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. या प्रतिनिधींचे आम्ही ऋणी आहोत. समाजसेवक राजेंद्र बाबर यांनीही समाजाच्या सुरक्षेबाबत मनोगत व्यक्त करून समाजाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद शिवनारायण बन्सल यांनी समाजाच्या वतीने सर्वांचे मानले.






















Join Our Whatsapp Group