

त्यावेळी डॉ. प्रतिभा डेंटल क्लिनिक व इम्पॅक्ट सेंटर त्यांच्या वतीने दंत तपासणी केली गेली, तसेच जिजामाता रुग्णालय व पिंपळे सौदागर दवाखान्याचे प्रफुल्ल तपशालकर यांच्या टीमने स्त्री रोग, गरोदर माता तपासणी, किशोरवयीन मुलींची समुपदेशन, त्वचा रोग, कोविड-१९ लस व बुस्टर डोस, राजीव गांधी जनआरोग्य योजनेतील माहिती, लहान मुलांची तपासणी तसेच स्वामी समर्थ हेल्थ सेंटर चिंचवड यांच्या वतीने रक्तदान तपासणी शिबीर, हिमोग्लोबीन तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तगट तपासणी, टीबी, थायरॉईट तपासणी केली गेली.
ओएसजी आय हॉस्पिटल तर्फे 334 लोकांचे मशीनमधून डोळे तपासणी करून चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले. तसेच शहरामध्ये रक्त तुटवडा निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 245 लोकांनी दंत तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराच्या माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी स्वप्निल पटांगे, संजय गांधी योजनेचे भीमाशंकर बनसोडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, समता दुत प्रशांत कुलकर्णी व भारती अवघडे, प्रकाश राठोड, ज्येष्ठ समाजसेविका शारदा मुंढे, उद्योजक अनिल आसवानी, समस्थ रहाटणी गावकरी मंडळाचे अध्यक्ष देवाआप्पा नखाते, मोरेश्वर नखाते, राजु भालेराव आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले तसेच अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभाग विभागाचे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, तसेच बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.
“विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यासाठी नागरिकांच्या हितासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला. असे प्रतिपादन माजी महापौर माई ढोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरूण चाबुकस्वार व सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार यांनी केले होते. सुत्रसंचालन सचिन कळसाईत यांनी केले, तर अमित भालेराव यांनी आभार मानले.





















Join Our Whatsapp Group