पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुल भोसले यांच्यावतीने प्रभाग क्रमांक १३ मधील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना १० हजार वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
२७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा भोसले युथ फाऊंडेशन यांच्या वतीने आणि शिवसेना शाखा मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १३ मधील शाळेतील विद्यार्थांसाठी १० हजार वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुलदादा सर्जेराव (आबा) भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोविड काळात उद्धवसाहेब ठाकरे यांनी कशा प्रकारे राज्याची काळजी घेतली, विद्यार्थ्यासाठी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे आपण सर्वांनी साहेबांना दीर्घ आयुष्य मिळो हिच प्रार्थना करूयात. आज जरी पक्षावर संकट असेल तरी शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहील, कारण संघर्ष करुन उभा राहणे ही वंदनीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे अशा शब्दात व्यक्त झाले.
या कार्यक्रमासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेना तालुकाप्रमुख दत्ता मोहोळकर भोसरी विधानसभा ज्येष्ठ शिवसैनिक माजी समन्वयक भोसरी विधानसभा सर्जेराव नारायण (आबा) भोसले उपशहर प्रमुख नेताजी काशीद, शहरसंघटक रावसाहेब थोरात, विभाग प्रमुख सतीश डीसले, उपविभागप्रमुख संजय गाढवे, चंद्रकांत जाधव, दादाराव ठाकरे, गोविंद गोरडे, शाखाप्रमुख आनंद हिंगे, सुखदेव देवकर, हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे, अशोक गायकवाड, अनंत मते, युवासेना विभाग प्रमुख प्रवीण पाटील, भोसरी विधानसभेचे महिला संघटिका जनाबाई गोरे आदी उपस्थित होते.