पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवा निमित्त मोशी येथे कै.पराग अभंग सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेश विसर्जन कुंड व मूर्ती दान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदी पात्रातील प्रदुषण रोखण्यासाठी मोशी परिसरातील नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संयोजक पंकज अभंग यांनी केले आहे.

इंद्रायणी नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून कै.पराग अभंग सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून गणेश भक्तांच्या सोयसाठी “श्रीं” च्या मूर्ती विसर्जनासाठी ‘गणेश विसर्जन कुंड’ व गणेश मूर्ती दान केंद्र मोशी टोल नाका, इला सोसायटी समोर उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी या सुविधेचा परिसरातील नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी घ्यावा आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. येथे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीची व्यवस्था करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group