पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक राहुल कलाटे लढणार आहेत. या निवडणुकीत त्यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. राहुल कलाटे यांनी माघार घेण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. आज सकाळी शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी देखील कलाटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कलाटे बंडखोरीवर ठाम राहिले आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेण्याकरिता आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची मुदत होती. राहुल कलाटे यांनी या निवडणुकीत त्यांची उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे.






















Join Our Whatsapp Group