पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज (दि.१०) शेवटच्या दिवशी ५ जणांनी माघार घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ३३ पैकी पाच जणांनी माघार घेतल्यामुळे तब्बल २८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणार उरले आहेत.

या निवडणुकीत ४० पैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीत पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार राहिले आहेत.
आज अर्ज माघे घेतलेेले उमेदवार खालीलप्रमाणे..
१) राजेंद्र मारूती काटे
२) भाऊसाहेब रामचंद्र अडागळे
३) प्रविण अशोक कदम
४) अॅड. मनिषा मनोहर कारंडे
५) रविंद्र पारधे (सर)
Tags: Chinchwad Election




















Join Our Whatsapp Group